सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

पंचम स्थान

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

पंचम स्थान हे ज्योतिषशास्त्रात अतिशय महात्त्वाचे स्थान आहे.  जर कधी ज्योतीष्याचे भविष्य चूकत असेल तर निश्चितच केवळ या स्थानामुळे कारण हे स्थान जातकाचे संचिताचे स्थान आहे म्हणजे गत जन्माचे केलेले कर्म हे अदृष्ट रुपाने या जन्मी भोगावे लागतात व या कर्मचा भविष्यवेध ज्योतिषास घेणे अवघड जाते.

एकाच आईचे जुळे मुले एक उच्च पद्दावर तसेच आयुष्यात यशस्वी होतो तर दुसरा मात्र आयुष्यभर जीवनात संघर्ष करीत असतो, तर मग असे का ? काही मिनिटांच्या जन्मवेळेच्या फरकात हा एवढा मोठा बदल कसा. हयाचे उत्तर मिळणे कठीण आहे. कादाचीत के. पी मध्ये मिळेल देखील परंतु त्याची तीव्रतेचे मोजमापन करणे मात्र कठीण आहे.

येथे मला श्री राम प्रभूने वानावासाला जात असताना आपल्या मातेस संबोधिल्या ओळी आठवतात, ते म्हणतात,
"माय कैकई ना दोषी, नव्हे दोषी तात,
राज्यभार कानन यात्रा सर्वे कर्म त्यात,
खेळ चालालासे माझ्या पूर्वसंचिताचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हा दोष ना कुणाचा"

हा विषय येथे मांडण्याचा उद्देश असा आहे कि, आमचे मित्र ज्योतिष अभ्यासक श्री नितीन यांचा फोन मला आला आमचा विषय पंचम स्थावावर चालू होता फोन झाल्यावर माझ्या ऑफिस मध्ये जातक हे आपल्या मुलाची पत्रिका बनविण्यासाठी आले, मुलगा होऊन दोनच दिवस झाले होते, ठीक आहे नामकरण करण्यासाठी वेळ नक्षत्र घटिका पाहेने योग्य वाटते परंतु जातक लगेच आपला मुलाची पत्रिका कशी आहे ? तो काय होणार डॉक्टर कि इंजीनियर ? असे प्रश्न सुरु झाले.

आता मी काय सांगू यांना त्या बाळाने आजून निट डोळे देखील उघडले नसतील तोच यांचे प्रश्न सुरु झाले. आहो पूर्वी देखील मौंज किवा धनुर्विद्या शिक्षण घेण्याकरिता जेंव्हा बालक जायचे तेव्हा राजा किंवा जातक हे ज्योतिषकडे त्याचे भविष्य बघायचे.  परंतु आता एवढा वेळ आहे तरी कुणाला कारण competition चा जमाना आहे.  

माझ्याकडे येणाऱ्या या जातकाच्या मुलाचे प्रत्यक ग्रह हा पंचमचा बलवान कार्येश ग्रह आहे, मग या स्थावावारून, खेळ, आवड, कला, जुगार, रेस, साधना इत्यादी सर्वे बघतात जे की स्थाने सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, व बाबा रामदेव यांची अशीच बलवान आहेत मग यातील हा कोन होईल हे नवीन जन्मलेल्या बालकाचे भविष्य सांगणे मात्र कठीण होईल. त्यामुळे बालकाचा विशिष्ठ वयामध्ये तसेच त्याचा कल कुठल्या क्षेत्रात आहे हे समजणे योग्य व त्याच्या संचित कर्माची चांगली साथ मिळाली तर तो निश्चितच यशस्वी होईल यात शंका नाही. असो...

आपला,

Preview



1 टिप्पणी: