४ स्टेप थेरी




'४-स्टेप थेरी चे जनक '

डॉ. सुनील गोंधळेकर

संपादक - नक्षत्राचे देणं 


१)  ४-स्टेप थेरी (नियम सारांश):

(४-स्टेप थेरीचा बेसिक व अडव्हान्स अभ्यासक्रम उपलब्ध)
  •  ज्या नक्षत्रात ग्रह नाहीत ते बलवान कार्येश ग्रह तसेच स्वनक्षात्री असणारे ग्रह देखील बलवान कार्येश ग्रह असतात.
  • बलवान कार्येश ग्रहांच्या राशींच्या भावात एकही ग्रह नसतील तर ते भाव बलवान असतात.
  • नक्षत्र स्वामी हा नेहमी बलवान असतो त्यामुळे नक्षत्रस्वामी हा ज्या भावात असतो तेव्हा त्या भावात ईतर कुठलाही ग्रह असेल तरीदेखील तो त्या भावाचा बलवान कार्येश ग्रह होतो.
  • भावारंभावार ग्रह हे बलवान असतात.  मात्र हा ग्रह ३ अंश २०' च्या दिप्तांशात असावा लागतो.  अनुभवाप्रमाणे आपण या  दिप्तांशामध्ये ५ अंशापर्यंत वाढ करू शकतो.
  • या थेरीत राहू  व केतूला महत्त्व दिले आहे.  राहू-केतू नक्षत्रस्वामी म्हणून कार्य करतात त्यावेळी त्यांचा नक्षत्र स्वामी देखिल विचारात घ्यावा.
  • बलवान कार्येश ग्रह:  या थेरीत बलवान कार्येश ग्रह शोधायचे असतात.  नेहमी कुंडलीच्या शेजारी  ग्रह - नक्षत्रस्वामी - सब (उप)  असे कॉलम पद्धतीने दिलेले असतात.  नक्षत्रस्वामीच्या कॉलममध्ये जर एखादा ग्रह नसेल याचाच अर्थ असा की त्या ग्रहाच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही उदा. समजा न स्वा. कॉलममध्ये आपणास गुरु हा ग्रह दिसत नाही. त्यामुळे गुरु हा बलवान कार्येश ग्रह झाला आहे.
  • स्वनक्षत्री:  समजा न. स्वा. च्या कॉलममध्ये एखाद्या ग्रहाच्या शेजारी तोच ग्रह असेल याचाच अर्थ तो ग्रह स्वनक्षत्री आहे. उदा. ग्रह राहूच्या शेजारी न.स्वा. कॉलममध्ये राहू असेल म्हणजे राहू हा स्वतः च्याच  नक्षत्रात आहे.

२) गोचर भ्रमण : 

  • ४-स्टेप मध्ये शिग्रगतीच्या ग्रहांच्या (रवि, मंगळ, बुध, शुक्र) घोचारेचा विचार करताना ग्रह कोणात्या नक्षत्रातूनजात आहे हे बघावे लागते, तर मंदगतीच्या ग्रहांच्या (गुरु, शनी, राहू, केतू) गोचारेचा विचार करताना गोचारेचा ग्रह कोणाच्या सब (उप) मधून जात आहे ते बघावे लागते. 
  • जन्म/प्रश्नकुंडलीमध्ये  पहिल्या दोन पायरीवर प्रश्नास अनुकूल असणारया भावांच्या बलवान कार्येश असल्यास हे भ्रमण घटना घडविण्यास अनुकूल ठरते, नसता हे भ्रमण साखळी जुळली जरी असेल तर प्रतिकूल ठरते.

३) सबची प्रतिकूलता 

  • एखादा ग्रह अनुकूल किंवा प्रतिकूल भावाचा कार्येश होत असेल तर तो अनुकूल फळे देतांना आढळतो. जर सब हा तिसऱ्या व चोथ्या पायरीवर संपूर्णपणे फक्त प्रतिकूल भावांचा कार्येश होत असेल तर असा ग्रह हा त्या अनुकूल भावाची फळे देत नसल्याची आढळते.
  • जेंव्हा असा ग्रह दशा, अंतरदशा अथवा विदाशास्वामी असतो तो त्या सम्बंधित दशेचे फळ देत नाही. यालाच 'सबची प्रतिकूलता' संबोधले आहे.
४-स्टेपचे अभ्यासक्रम, पुस्तके, व दिवाळी अंक खालील पत्तावर उपलब्ध 

संपादकीय मुख्य कार्यालय:                                                 
नक्षत्रचं देणं
१०९, गोदावरी,
लक्ष्मी इंड कोम्प्लेक्स
वर्तकनगर
ठाणे ४००६०६ 
फोन:  २५८८८१७९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा